माकणीत थोर 87 हजाराचे देशी-विदेशी मद्य जप्त

1237

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे निलंगा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांच्या नियुक्त पथकाने मौजे माकणी थोर येथे सोमवारी दुपारी 2.30 वाजता निलंगा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या छाप्यात 87 हजार रुपयाची देशी – विदेशी दरु जप्त केली.

पोलिसांची गस्तीवर असणारी जीप आडत लाईन कर्नाटकच्या सीमेवर दुपारी 1.30 वाजता आली. औराद शहाजानी येथील हद्दीत गुणाबाई पंडीत जाधव स्वत:च्या रहात्या घरी विनापरवाना विदेशी दारु बाळगून तिची चोरटी विक्री व्यवसाय करत असल्याची बातमी मिळाली. जप्ती पंचनाम्यातील नमुद दोन पंच यांना बोलावत गुणाबाई पंडीत जाधव यांच्या घरावर छापा टाकला. तिथे पोलिसांना मुद्देमाल सापडला. त्याबाबत विचारले असता हा माल आपला भाचा संभाजी ज्ञानोबा धुमाळ याचा असल्याचे सांगितले. विदेशी दारुच्या बाटल्या पंचासमक्ष ताब्यात घेत सीलबंद करण्यात आला. त्यात एकुण 87,971 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. निवडणुकीचे काळात अवैध चोरटी विक्री करण्यासाठी संभाजी धुमाळ याने अवैध साठा केला होता. या प्रकरणी गुणाबाई पंडीत जाधव (वय 70) आणि संभाजी ज्ञानोबा धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत निलंगा येथील उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबर गोविंद बिराजदार , पोलीस उपनिरीक्षक जी.जे.क्षीरसागर यांच्यासह पथक सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या