
मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे आता थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीम) करण्यात येणार असून उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी सर्वसामान्यांना सोमवार पासून लाईव्ह पाहता येणार आहे. पहिल्या पाच खंडपीठातील सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. त्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हायकोर्टाचे कामकाज लाईव्ह पाहता यावे यासाठी ऍड मॅथ्यू नेदुंपरा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयांचे थेट प्रक्षेपण करण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे सांगितले होते.