
सामना ऑनलाईन । मुंबई
मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मान्सून आता गोव्याच्या सीमेवर पोहोचला आहे. बुधवारी जाणवणाऱ्या प्रचंड उकाड्यानंतर आज पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
गुरुवारी पहाटेपासून मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, मुलुंड, घाटकोपर, गिरगाव या भागात मुसळधार पाऊस पडला. तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण-अंबरनाथ-बदलापूर या भागात विजांचा खेळ पाहायला मिळाला.
दरम्यान, ठाण्यात आता पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे.

























































