
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्याच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. संपूर्ण राज्याचा निकाल हा 85.88 टक्के इतका लागला असून पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी लागला आहे. दरम्यान, बारावीचा निकाल आज 28 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.
यंदा विज्ञान शाखेचा निकाल 92.60 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 88.28 टक्के, कला शाखेचा निकाल 76.45 टक्के इतका लागला आहे. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी 90.26 इतकी आहे.
कोकण विभागाचा निकाल 93.23 टक्के तर नागपूरचा निकाल 82.51 टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 87.88 टक्के इतका लागला आहे. अमरावतीचा 87.85 टक्के तर नाशिकचा 84.77 टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल मुंबई 83.85 टक्के इतका लागला आहे.
दुपारी 1 वाजता येथे पहा निकाल
– www.mahresult.nic.in
– www.hscresult.mkcl.org
– www.maharashtra education.com
– www.maharashtra12. jagarnjosh.com


































































