पराभव दिसू लागला की काँग्रेस भीतीचं वातावरण निर्माण करते, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

निवडणुकांमध्ये आपला पराभव दिसू लागला की मुस्लिम धोक्यात, दलित धोक्यात, संविधान धोक्यात असं म्हणत देशात भीतीचं साम्राज्य निर्माण करायचं आणि यातून आमचा पक्ष, आम्हीच (गांधी परिवारच) तुम्हाला वाचवू शकतो, अशी भाषा करायची, ही काँग्रेसची जूनी कार्यपद्धतीच आहे. आणीबाणीच्या काळात देखील त्यांनी तसंच केलं होतं. त्यामुळे तेव्हाची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यांची मानसिकता बिलकूल बदललेली नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकच्या वार्षिक बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील संबोधित केलं. काँग्रेसच्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ काळा दिन साजरा करण्यात येतो. त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

मोदी सरकार संविधान विरोधी असल्याची भीती काँग्रेसकडून लोकांमध्ये निर्माण केली जात आहे. पण आम्ही संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. संविधानाप्रति लोकांची श्रद्धा वाढावी यासाठी आम्ही अधिक प्रयत्न केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदींच्या मुंबईती या विशेष भाषणाती महत्वाचे मुद्दे आणि व्हिडीओ:

  • जो दलित, पीडित, शोषित आहे त्याला सोबत घ्यायचे आहे, त्यांना हात द्यायचा आहे
  • त्यामुळे या घटनेला आपण विसरून चालणार नाही
  • जनता जनार्दानानं लोकशाही आपल्या बळावर लोकशाही पुन्हा प्रस्थापित केली
  • आणि निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, लोकशाही जिंकली
  • निवडणुकांच्या काळात बसमधील एक प्रसंग सांगितला, गरीब वृद्ध महिला स्वातंत्र्य सभेला दान देण्यासाठी नवी नोट मागत होती
  • त्यानंतर काँग्रेसला वाटलं की आता निवडणुकीत जिंकून येऊ
  • पण काँग्रेसला कळालंच नाही की हिंदुस्थानच्या लोकांच्या मनात लोकशाही रुजली आहे
  • संसदीय पद्धतीच काँग्रेसने त्या काळात संपवलं होतं
  • संविधानाप्रति श्रद्धा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे
  • पण आम्ही संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चा केली
  • आता नवी भीती घातली जात आहे मोदी संविधान बदलतील
  • आणि आमच्याविरोधात लोकांमध्ये भीती निर्माण करतात, की मुसलमान-दलित संकटात
  • आंधी चित्रपटावर बंदी आणली होती
  • आणीबाणीच्यानंतर देखील काँग्रेसची मानसिकता बदलली नाही
  • किशोर कुमार यांनी गाणं गायला नकार दिला, म्हणून त्यांचं गाणं रेडिओवरून गायब केलं
  • पत्रकारांना झुकवलं होतं
  • पत्रकार आज आमच्यावर टीका करतात, पण आणीबाणीच्या काळात त्याची अवस्था अत्यंत वाईट होती
  • पण कर्नाटक विजयानंतर यांना इव्हीएम घोटाळा आठवला नाही
  • ४०० वरून ४४ वर आलेल्या काँग्रेसला सहन होत नाही, त्यामुळे इव्हीएम आणि निवडणूक आयोगावर टीका सुरू केली
  • देशात आणीबाणी आणणारी आणि आज सरन्यायाधिशाविरोधात महाभियोग आणण्याची मागणी करणारी काँग्रेसची मानसिकता एकच आहे
  • याच काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशाविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी केली
  • या लोकांना कधी वाटलं नव्हतं की त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, कधीतरी जामीन घ्यावा लागू शकतो-मोदी
  • ज्यांनी कुटुंबाशी निष्ठा दाखवली त्यांची चंगळ होती
  • जो आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाईल, त्याला कोर्टकचेरीत फसवलं गेलं
  • जेव्हा जेव्हा काँग्रेसची, या कुटुंबाची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा ते सांगतात देश संकटात आहे आणि फक्त आम्हीच तुम्हाला वाचवू शकतो
  • स्वत:च्या कुटुंबाला पक्षाला वाचवण्यासाठी हे सारं सुरू होतं
  • हे सर्व संविधानाच्या आड केलं गेलं होतं
  • अत्यंत भीतीचं वातावरण तेव्हा होतं
  • सत्ता सुख आणि परिवारवादात अडकलेले लोक देशाला तुरुंग बनवतील असं वाटलं नव्हतं
  • व्यक्तीस्वातंत्र्यासाठी जी तडफड काय होते ते आज कळत नाही
  • ज्यांनी पारतंत्र्य अनुभवलं नाही त्यांना त्याची भीषणता कळणार नाही
  • संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी आणीबाणीचा हा दिवस आठवण करतो
  • आम्ही आपल्याला सज्ज ठेवण्यासाठी याचे स्मरण करतो
  • आम्ही देशातील वर्तमान आणि भावी पिढीला जागरुक करू इच्छितो
  • केवळ काँग्रेसवर टीका करण्यासाठी काळा दिवस साजरा करत नाही
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात

  • वृत्तपत्रांवर देखील बंदी आणण्यात आली होती
  • माझ्या वडिलांना देखील आणीबाणीच्या काळात ताब्यात घेण्यात आलं होतं
  • संविधानाच्या विरोधात आम्ही नाही तर काँग्रेसनं काम केलं
  • काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली
  • काँग्रेसच्या काळातील आणीबाणीच्या विरोधात भाषण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बिर्ला मातोश्री सभागृहात पोहोचले

  • मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील विमानतळावर मोदींचं स्वागत केलं
  • राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचं केलं स्वागत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल