
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. यंदा हा सोहळा पवई येथील ‘वेस्ट इन’ हॉटेलमध्ये होत असून पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करत आहेत.
- देसाई साहेब व रावते साहेब यांना विचारलं की सचिन अहिर व आमशा पाडवी यांना संधी देण्याविषयी विचारलं तेव्हा ते आम्हाला सांगितलं की हे विचारता कशाला, तुमचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा. आम्ही शिवसैनिक आहोत व कायम राहणार असं सांगितलं हेच शिवसेनचं मोठं यश आहे.
- एक आदिवासी आपल्या हक्काचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवण्याची संधी आपण अमशा पाडावे यांना दिले आहे.
- संपूर्ण हिरवा वरवंटा महाराष्ट्रावर येत असताना तो उडवून लावायचं काम महाराष्ट्राने केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे.
- ऐन उमेदीच्या वयात तुम्ही त्याला मृगजळ दाखवणार. त्याच्या मागे तुम्ही त्यांना धावायला लावणार. भाडोत्री सैन्य काय हा प्रकार आहे?
- नोटाबंदी झाली. तेव्हा हू का चू कुणी केली नाही. त्यानंतर शेतकरी कायदे आले. तेव्हा शेतकऱ्यांनी धाडस दाखवलं. मेलो तरी चालेल पण घऱी जाणार नाही. नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावं लागलं. आता हे नवीन टुमणं. अग्नीवीर. नावं मोठं द्यायचं. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की
- राज्य पाहिजे. पण जर राज्य मिळाल्यानंतर जर तुम्ही ते नीट करायला तयार नसाल तर तुम्ही नालायक आहात – उद्धव ठाकरे
- नुसत्या उद्धव ठाकरेला दीड दमडीची किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासमोर समोरचा माणून आदराने उभा राहतो. मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही. कारण माझं जे नाव आहे ते बस आहे.
- उद्या निवडणूक आहे. पण मी त्याचा विचार करत नाही.. राज्यसभेत आमच्या एकाही सहकाऱ्याचं मत फुटलं नाही. कुणाचं फुटलं ते देखील समजलं आहे. पण उद्याच्या राजकारणात ते उद्या कुणीच फुटणार नाही हे नक्की. एकदा बाळासाहेब म्हणाले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या शिवसेनेत नको, तसं मलाही नको.
- आज शिवसेना 56 वर्ष पूर्ण करते आहे. उद्या निवडणूक आहे. आजचं हे जे चित्र आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवावं लागतंय. आपलेच आमदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. मला हे जे आजचं चित्र आहे. ते मला अजून चांगलं दिसलं पाहिजे. आज जे समोर दिसतंय त्याच संख्येने मला आपले आमदार पुढच्यावेळी दिसले पाहिजे. – उद्धव ठाकरे
- सुभाष देसाई व दिवाकर रावते यांना मी विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण तरिही ते आजही त्याच उमेदीने काम करतायत. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा जेव्हा त्यांना जबाबादारी दिली. तेव्हाही त्यांनी नेहमी ती जबाबदारी चोखपणे पार पडली.
- शिवसेनाप्रमुखानंतर शिवसेनेचं काय याला आपण कणखरपणे उत्तर दिलं आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात
- 56 वर्षानंतरही न्यायाच्या लढ्यात, सत्याच्या लढाईत कुणी पुढे असेल तर फक्त शिवसेना आहे. शिवसेनेच्या अंगावर राणा बाना काना, असे बरेच किरकोळ लोकं सोडले. पण शिवसेनेचा राष्ट्रीय बाणा हा सर्वांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे.
- अग्नीवीर… सैन्यात आता कंत्राटी पद्धतीवर भरणार… चार वर्षाचं कंत्राट. जगाच्या पाठीवर असा मुर्ख निर्णय कुणीही घेतला नसेल. असा तुघलकी निर्णय कुणीही घेतला नाही. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैनिक नाही. संपूर्ण देशात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्र शांत आहे पण तो खदखदतोय. – संजय राऊत
- राजकारणात फार घमेंड आली आहे. काही लोकांना. राज्यसभेचा निकाल आला. एखादी जागा इथे तिथे होत असते. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं असं नाही. या राज्याची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार. तेरा घमंड तो चार दिनका है पगले. हमारी बादशाही तो खानदानी है. ती राहणार. या बादशाहीला नख लावयची हिंमत कुणात नाही.
- आज फादर्स डे आहे. फादर ऑफ नेशन असा उल्लेख यायचा तेव्हा बाळासाहेब म्हणायचे की देशाला बाप नाही. पण आज मी सांगू शकतो की बाळासाहेब हे फादर ऑफ हिंदुत्व आहेत. ज्याच्या मनात हिंदुत्व आहे. रोमारोमात हिंदुत्व आहे. तो प्रत्येकजण बाळासाहेबांना बाप मानतो. आणि बाप एकच असतो. – संजय राऊत
- आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन. 56 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी एक ठिणगी महाराष्ट्रात टाकली. त्या ठिणगीचा देशभरात वणवा पेटला. त्या वणव्याचा आज वर्धापन दिन आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक आमदारांकडून स्वागत
- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेस्ट ईन हॉटेलवर पोहोचले
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर रवाना






























































