LIVE: कर्जत कल्याणदरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
वसईत पाणी साचल्याने गाड्या बुडाल्या.

सामना ऑनलाईन, मुंबई

  • वरळीत जोरदार पावसाला सुरुवात

  • विरारदरम्यान पावसामुळे अडकून पडलेल्या एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने विशेष ट्रेनने २००० फूड पॅकेट्स पाठवली.

 

  • कल्याणमधील रामबाग परिसरात रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक, घरी परतणारा नोकरदारवर्ग ट्रॅफिकमध्ये अडकला
  • कर्जत कल्याणदरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात
  • पालघर येथील भोईडापाडा येथे मुसळधार पावसामुळे अडकून पडलेल्या १२० जणांना बचाव पथकाने सुरक्षित स्थळी हलविले.

 

Team of NDRF has reached Nallasopara to help Railway administration, civic body, Local police & RPF in relief and rescue measures for the passengers of trains regulated in the area due to heavy water levels on rly tracks pic.twitter.com/Z5imFt6bLU

— Western Railway (@WesternRly) July 10, 2018

  • पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मदत करणार, बचाव आणि मदतकार्य करणार
  • एनडीआरएफचे ३५ जवान नालासोपाऱ्याला पोहोचले.
  • गोरेगाव, दादरमध्ये सर्वाधिक पाऊस, तर मुलुंड पश्चिमेला सर्वात कमी पाऊस
  • सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोड, बीकेसी जंक्शन, रझा जंक्शन येथेही ट्रॅफिक मंदावले
  • हिंदमाता जंक्शन, सायन येथील गांधी मार्केट, बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथे ही ट्रॅफिक संथ
  • दादर टी. टी. ते कोतवाल गार्डन, न. चि. केळकर मार्ग, सेना भवन इथे ट्रॅफिक मंद गतीने सुरू
  • दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व मुक्त मार्ग इथे वाहतूक सुरळीत
  • राकेशचा मृतदेह सापडला, पोलीस करताहेत पुढील कारवाई
  • डोंगरपाडा तलावात मित्रासोबत पोहायला गेला होता राकेश
  • राकेश खोत (३०) असं मृत तरुणाचं नाव
  • विरारच्या डोंगरपाड्यात एकाचा बुडून मृत्यू
  • दादर आणि परळ भागात पावसाची विश्रांती
  • मुसळधार पावसाने मध्य रेल्वेने घेतला निर्णय
  • अप आणि डाऊन मार्गावरची इंद्रायणी एक्सप्रेस रद्द
  • मंगळवार आणि बुधवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द
  • कर्जत पुणे पॅसेंजर रद्द
  • वाशी ते सीएसएमटी रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प
  • मुंबईत पुढले २४ तास आणखी मुसळधार पावसाची शक्यता- हवामन विभाग
  • विनोद तावडे यांची नवी माहिती, शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा
  • वसईतील पावसाची भीषणता दाखवणारा फोटो

heavy-rain-vasai

  • माटुंगा रोड रेल्वे पुलाला तडे, वाहतुकासाठी पुल बंद ठेवण्याचा निर्णय (फोटो: सचिन वैद्य)
  • मुंबईत मुसळधार पाऊस, मात्र अतिवृष्टीचा इशारा नाही- विनोद तावडे
  • एल्फिन्स्टन पुलावरून जाणारी वाहतूक थांबवली… (फोटो: सचिन वैद्य)

elphinstone-bridge-closed

  • शीव स्टेशनवर झालेल्या पावसाने रेल्वे रुळ असे पाण्याखाली गेले. यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत.

  • हिंदुस्थानातील पावसाच्या स्थितीचे सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेले छायाचित्र (सकाळी ८:३०वाजता)

satellite-iamge

  • मुंबईत गेल्या २४ तासात १६५.८ मीमी तर मुंबई उपनगरात १८४.३ मीमी इतका पाऊस नोंदवण्यात आला आहे

  • मुंबई-ठाणे-पालघरमधील मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत

  • जीवनावश्यक वस्तू (दुध,भाजीपाला) टंचाई
  • तलाव-नाले भरून वाहू लागल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले
  • वसई पश्चिम ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क तुटला
  • वसई-विरारमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
  • लांबपल्ल्याच्या गाड्या जागच्या जागी उभ्या आहेत
  • मागील १ तासात एकच लोकल धावली
  • विरारला पाच नंबरवर भुज एक्सप्रेस आणी सहा वर जामनगर उभी आहे लोकशक्ती नारींगी फाटकात उभी आहे
  • नालासोपारा येथे विरार चर्चगेट लोकल  जागेवरच उभी आहे
  • पावसाचा विमान वाहतुकीवरही परिणाम
  • हार्बरची वाहतूकही २० मिनिटे उशिराने

taxi in mumbai rain

  • विरार-बोरिवली वाहतूक ठप्प, बोरिवली-चर्चगेट वाहतूक २० मिनिटे उशिराने
  • माटुंग्याजवळ रुळावर पाणी जमायला सुरुवात
  • मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

dombivli-east-during-rain

  • कुर्ला आणि सायन दरम्यान मुसळधार पाऊस
  • नालासोपाऱ्यात वीजपुरवठा खंडीत
  • अनेक ठिकाणी शाळांनी स्वत:हून सुट्टी दिली
  • सकाळी साडेपाच वाजेपर्यंत सांताक्रूझ इथे १३७.१ मिलीमीटर पावसाची नोंद
  • आज सकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा इथे १४५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे
  • माटुंग्याच्या किंग्स सर्कल भागात पाणी साचायाला सुरुवात
  • वसई आणि विरार दरम्यानची वाहतूक बंद करण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय
  • सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांनी समुद्राला भरती
  • चौथ्या दिवशीही रायगडात पाऊसाचा जोर कायम
  • डबेवाल्यांनी त्यांची सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
  • सोमवारी इंद्रायणी नदीत पाय घसरून शालिनी बुडाली होती
  • २५ तासानंतर शालिनी चंद्रबलन हीचा मृतदेह सापडला
  • तळेगाव इथल्या कुंडमळा बघायला गेलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला
  • विरार आणि नालासोपारादरम्यानची लोकल वाहतूक बंद
  • नालासोपारा स्थानकात रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय वाहतूक बंद.
 NALASOPARA-STATION-AREA-UNDER WATER
नालासोपारा स्टेशनचा परिसर पावसामुळे जलमग्न झाला होता
  • अवंतिका एक्सप्रेस सफाळे स्थानकात उभी
  • जयपूर- वांद्रे एक्सप्रेस आणि सौराष्ट्र मेल पालघर स्थानकात उभ्या
  • मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात