2014मध्ये बोलणारे मोदी आता महागाईवर मौन, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

सामना ऑनलाईन । मुंबई/नवी दिल्ली

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असून, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. वाचा सर्व अपडेट.

LIVE UPDATES ON BHARATHBANDHA

सोलापूर: बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला

 • काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
 • विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आंदोलनात सहभागी
 • नगर जिल्ह्यात हिंदुस्थान बंदला संमिश्र प्रतिसाद

 

 • येत्या निवडणुकांमध्ये सारे विरोधक एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांना पराभूत करणार
 • जीएसएटीवर मोदी कधी बोलत नाही
 • नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचं नाही पण उद्योगपतींचं कर्ज माफ केलं
 • नोटाबंदी करून केवळ उद्योगपतींचा काळा पैसा सफेद केला
 • देश आणि तरुण वर्ग त्यांच्याकडून ज्या विषयांवर काही ऐकण्यास उत्सुक आहेत ते बोलत नाही
 • 2014 मध्ये पंतप्रधान मोदी पेट्रोल-डिझेल दरवाढीवर बोलत होते, मात्र आता मौन आहेत
 • मोदींनी सत्तेवर येण्याआधी दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत
 • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण सुरू

sharad-pawar-at-ramlila-maidan

 • अटलजी जिवंत असताना त्यांची चिंता या लोकांना नव्हती, आता त्यांच्या निधनानंतर त्यांचं नाव घेतलं जात आहे- शरद पवार
 • आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी अटलजींच्या आदर्शावर चालावं- शरद पवार
 • मध्य प्रदेश: उज्जैनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपाची केली तोडफोड

 • मुंबईत वर्सोवा मेट्रो स्टेशनवर मनसे कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन

 • बिहार: पाटाणा येथे जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वाहनांची तोडफोड

 • मनमाड-नाशिक बससेवा बंद
 • दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रामलीला मैदानावर पोहोचले… दिल्लीत विरोधकांचं शक्ती प्रदर्शन

 

 

 

 • नगर: पारनेर आगार पूर्णपणे बंद
 • संजय निरुपम आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
 • मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, मुंबईचे प्रदेशादध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे उपस्थित
 • पोलिसांनी आंदोलकांना हटवले, वाहतूक पुन्हा सुरू
 • अंधेरी ते बोरिवली दरम्यानची वाहतूक आंदोलकांनी काही काळ रोखून धरली
 • मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकात काँग्रेसचे आंदोलन
 • राजस्थानमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

 

 • मीरा-भाईंदरमध्ये आंदोलकांनी टायर जाळले
 • पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी पीएमपीएलची बस फोडली
 • नाशिकमध्ये कडकडीत बंद
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ट्वीट करत राग व्यक्त केला

  घरगुती गॅस सिलिंडरने ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला. सणवार तोंडावर आले असतानाच महागाईने सामान्य गृहिणीचं कंबरडं मोडून गेलंय. सरकारला याचं काहीच सोयरसुतक नाही का?

  ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’#जवाबदो @PMOIndia @narendramodi @CMOMaharashtra @dpradhanbjp pic.twitter.com/j90AH5TCsD

  — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 10, 2018

  Delhi: Congress President Rahul Gandhi and opposition party leaders march from Rajghat towards Ramlila Maidan, to protest against fuel price hike. #BharatBandh pic.twitter.com/X7DQcVRgIA

  — ANI (@ANI) September 10, 2018

 • काँग्रेस अध्यक्ष राजघाट येथे पोहोचले, समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आंदोलनाला केली सुरुवात

  Delhi: Congress President Rahul Gandhi arrives at Rajghat to join bandh protest against fuel price hike pic.twitter.com/E79Dj4Hg3C

  — ANI (@ANI) September 10, 2018

 • गुजरातच्या भरुचमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, रस्त्यावर टायर जाळले

  #BharathBandh: Protesters in Gujarat’s Bharuch burn tyres and stop buses; traffic movement halted pic.twitter.com/G6b9OFNXg5

  — ANI (@ANI) September 10, 2018

 • मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे बंद

  CPI and CPM workers in Andhra Pradesh’s Vijayawada hold protest against fuel price hike. #BharathBandh pic.twitter.com/MbElm9sdmU

  — ANI (@ANI) September 10, 2018

 • वाचा बातमी: विरोधकांचा आज हिंदुस्थान बंद
 • तेलंगण: हैदराबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोकोला केली सुरुवात

  Telangana: Congress workers hold protests in Yadadri Bhuvanagiri district’s Bhongir (pic 1) and Musheerabad bus depot (pic 2) in Hyderabad, against fuel price hike #BharatBandh pic.twitter.com/cVoIXXJbNr

  — ANI (@ANI) September 10, 2018

 • शाळा-महाविद्यायले यांना सुट्टी नाही, मात्र अनेक शाळांनी स्वत:हून शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय
 • मुंबईतील रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत
 • बंदच्या काळातील घडामोडींवर पोलिसांची करडी नजर, सीसीटीव्हीद्वारे शहरावर लक्ष
 • मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज
 • आंदोलकांनी बंद शांतते पाळावा, तसेच नागरिकांनी सकार्य करावे अशी मागणी
 • बंदची माहिती देणारे फलक विविध शहरांत झळकले
 • पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचा हिंदुस्थान बंद
आपली प्रतिक्रिया द्या