Pulwama Attack Live : शस्त्र पुरविणाऱ्याला व वापरणाऱ्या कुणालाही सोडणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

  • शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक अश्रूचा बदला घेणार – मोदी
  • कुणालाही शांत झोपू देणार नाही – मोदी
  • शस्त्र पुरविणाऱ्याला व वापरणाऱ्या कुणालाही सोडणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • विरेंद्र सेहवाह शहीद जवानांच्या मुलांची जबाबदारी घेणार
  • शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार पाच लाख रुपये
  • परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक संपली

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी तमिळनाडूतील शहीद जवान सी. सिवाचंद्रन यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

  • शहीद जवान पंकज कुमार त्रिपाठी यांच्या हरपूर तोला गावात अंत्ययात्रेला सुरुवात

  • मध्यप्रदेशमधील जवान अश्वनी कच्छी यांचे पार्थिव त्यांच्या जबलपूरमधील गावी आणण्यात आले

  • फॉरेन्सिक तपासात ही माहिती समोर आली
  • पुलवामा हल्ल्यात आरडीएक्स बॉक्सचा झालेला वापर
  • देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जवान एकाच वेळी शहीद झाले आहेत. संपूर्ण देश, सर्व पक्ष जवानांसोबत आहेत. – आझाद
  • दहशतवादाविरोधात सर्व पक्ष एकजूट असल्याचा प्रस्ताव
  • बैठकीत सर्व पक्षांनी केला हल्ल्याचा निषेध

  • पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची बैठक बोलवावी – गुलाम नवी आझाद

  • दहशतवादाशी लढा देण्यासाठी सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा – आझाद
  • या कठीण प्रसंगी आम्ही सरकारसोबत आहोत – काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद

  • सर्व पक्षीय बैठक संपली
  • पुलवामा हल्ल्यावर परराष्ट्र मंत्रालयात बैठक सुरू
  • पाकिस्तानातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले.

  • महाराष्ट्रातील सुपुत्रांचे पार्थिव संभाजीनगर विमानतळावर
  • जम्मूत दुसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू

  • देशातील सर्व पक्षांचे नेते सर्वपक्षीय बैठकीसाठी हजर

  • एनआयएचे पथक पुलवामा येथे पोहोचले

  • संसदेत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात

  • सर्व पक्षीय बैठकीसाठी फारुख अब्दुल्ला संसदेत पोहोचले

  • थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होणार
  • केंद्रिय गृह राज्य सचिव राजीव गौबा केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानावर, पुलवामा हल्ल्याविषयी होणार चर्चा

  • बिहारमधील शहीद जवान रतन कुमार ठाकूर व संजय कुमार सिन्हा यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री नितीश कुमार व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दर्शन घेतले

  • मुंब्रामध्ये बंदची हाक, बंद ला 100 टक्के प्रतिसाद.

mumbra-1

  • नालासोपारा येथे हल्ल्याच्या निषेधार्थ रेल रोको, वसई विरारमध्ये रिक्षा वाल्यांचा देखील बंद

 हल्ल्याच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन, ‘परे’ची वाहतूक विस्कळीत

  • हिंदुस्थानचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारीया हिंदुस्थानात परतले. आज परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ट अधिकाऱ्यांची होणार बैठक

  • शहीद जवान रमेश यादव यांचे पार्थिव वाराणसीतील त्यांच्या मूळ गावी आणले. अंत्यदर्शानासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित

  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी शहीद जवान मोहन लाल यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

  • शहीद जवान मोहन लाल यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचले. मुलीने वडिलांना दिली आखरी सलामी

  • शहीद जवान रोहिताश लांबा यांचे पार्थिव त्यांच्या राजस्थानमधील गोविंदपूरा या मूळ गावी पोहोचले.

  • पुलवामा येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचले असून आज त्या सर्वांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.