
सामना ऑनलाईन । मुंबई
पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा येथे रेल रोको आंदोलन सुरू आहे. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वेचा खोळंबा झाला असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाच्या वेळेला हा निषेध होत असल्याने अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जात आहेत.



























































