नगर जिल्हयातही भारनियमनाला सुरवात; नागरीकांमध्ये संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

ऐन सनासुदीच्या तोंडावर नगर जिल्ह्यामध्ये भारनियमन सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात 7 ते 8.30 दरम्यान भारनियमन सुरु करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातही भारनियमनाची अंमलबजावणी करण्यास सरुवात झाली आहे. नगर शहरासह ग्रामीण भागात भारनियमन सुरु केले आहे. शहरी भागासाठी जी-1, जी-2, जी-3 या तीन गटात ते ग्रामीण भागात ई-एप-जी या गटात सुरु झाले आहे. त्यामुळे दिवसभर दोन टप्प्यात हे भारनियमन सुरुच राहणार आहेत. सोमवारी सायंकाळपासून त्याची सुरुवात झाली आहे. बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

सध्या उन्हाचा कडाका सर्वत्र जाणवू लागला आहे. ऑक्टोबर हिट असल्यामुळे विजेची मागणीसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सुमारे 2100 मेटावॅट विज निर्मिती संच कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद झाला आहे. आता महाविरणाने दोन टप्प्यात भारनियमन करण्याचा निर्णय सर्वत्र घेतला आहे. जर तुट वाढली तर अन्य गटांचेही भारनियमन करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर घेण्यात आला आहे. एकीकडे दुष्काळसदृष्य परिस्थिती झाली आहे. पाणी नसल्यामुळे पिके जळू लागली आहे. नगर जिल्हयात 12 तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती सध्या आहे. दुष्काळ जाहीर करावा म्हणून अनेकांनी मागणीही केली आहे. सध्या सर्वत्र विजेचा तुटवडा असल्याचे सांगून महाविरणाने सगळ्यात पहिले आता दोन टप्प्यात भारनियमन सुरु केली आहे. तसेच त्याची अम्मंलबजावणीसुध्दा केली आहे. या निर्णयामुळे जनतेला मोठा पटका बसणार आहे.