ठाणे ऐरोली दरम्यान लोकल रुळावरून घसरली

428

सामना ऑनलाईन । ठाणे

हार्बर मार्गावरील ठाणे ऐरोली दरम्यान लोकल रुळावरून घसरली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी  झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्ग प्रभावित झाले होते. त्यात मध्य आणि हार्बर मार्गावारील लोकल अनेक तास ठप्प होत्या. रविवारच्या दिवशी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो म्हणून आधीच लोकल बंद असतात. त्यात पुन्हा ठाणे ऐरोली मार्गावरील लोकल रुळावरून घसरल्याने लोकल पुन्हा रखडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच