50 धोकादायक स्पॉटवर रेल्वेचे अनोखे येलो झेब्रा क्रॉसिंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय लोकल मार्गावर दररोज रूळ ओलांडताना सरासरी दहा जणांचा मृत्यू होत असतो.  या मृत्यूंना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने 50 धोकादायक स्पॉटचा अभ्यास करून तेथील स्लीपर्सना पिवळा रंगाने रंगविण्याचे काम मध्य रेल्वेच्या आरपीएफने हाती घेतले आहे. हा प्रयोग यापूर्वी हार्बरच्या वडाळा रेल्वे स्थानकाजवळ करण्यात आला होता. त्यामुळे अपघाती मृत्यूंची संख्या कमी झाली आहे.  2018 मध्ये एकूण मृत्यू-2,981 तर रूळ ओलांडतानाचे मृत्यू -1,619 आणि 2019 मध्ये एकूण मृत्यू -2,691 तर  रूळ ओलांडतानाचे मृत्यू-1,455 असा मृत्युदर कमी कमी होत आला आहे.