लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेने अभियांत्रिकी कामासाठी तिन्ही मार्गांवर उद्या रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक काळात लोकलच्या काही फेऱया रद्द करण्यात आल्या असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार व हार्बरवर पनवेल ते वाशीदरम्यान तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.