लॉकडाउनची मागणी करणाऱ्या विखेंच्या बैठकीतच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरच्या के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला असताना रविवारी भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी बैठक घेतली खरी, मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत कोणती भूमिका प्रशासन घेते, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

भाजपाचे डॉ. सुजय विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन करा, अशी मागणी सातत्याने करत होते. या मागणीनंतर प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे खासदार सुजय विखे यांनी राजीनामा देतो, असे सूतोवाच त्यांनी केले होते. पुन्हा दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मी पुन्हा राजीनामा देतो, असे सांगितले होते.

दरम्यान, लष्कराच्या के.के रेंजच्या जमीन अधिग्रहणचा विषय जोरदार सुरू आहे. खासदार सुजय विखे यांनी रविवारपासून पारनेर तालुक्यापासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. यात जनजागृतीची मोहीम घेतली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला होता. मात्र आता त्यांची भूमिका बदलली गेल्यामुळे विखे यांनी समन्वयाची भूमिका ठेवली असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारने या कोविड संदर्भात नियम व अटी दिलेले आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे अशी सूचना दिली. एकीकडे नियम मोडणाऱ्या विरोधात दंड, वेळप्रसंगी थेट गुन्हा दाखल करण्याची भूमिका प्रशासनाने हाती घेतल्याचे दिसते. दुसरीकडे मात्र खासदार विखे यांनी सुरू केलेल्या दौऱ्यात अनेक मोठ्या मोठ्या बैठकाचे आयोजित केल्या आहेत. या अनेकांनी सोशल डिस्टनसिंग नियंमाचा फज्जा उडवले असल्याचे चित्र आहे. अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सुरक्षित अंतर नसल्याचे दिसत आहे. अगोदर जमीन देण्यास विरोध, नंतर खा.विखेनी घेतलेली समन्वयाची भूमिका, या दुहरी भूमिकेमुळे नेमकी खासदार सुजय विखेंना काय सध्या करायचे? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यातच विखेनी सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडत सुरू केलेल्या बैठकीबाबत प्रशासना काय कारवाई करते, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

नगर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र दुसरीकडे खासदार विखे यांनी स्वतःच्या विखे पाटील फाउंडेशन मार्फत स्वतंत्र चूल मांडली आहे. एकीकडे नगर महानगरपालिका व विखे फाउंडेशन एकत्रितपणे येऊन सध्या कोविड चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीककडे सशुल्क 150 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. विशेष म्हणजे खासदार विखे यांनी एकिकडे शिर्डी मतदारसंघात अवघ्या 500 रुपयांत कोविड टेस्ट सुरु केली आहे. तर दुसरीकडे विखे यांचा मतदारसंघ असलेल्या नगरमध्ये याच चाचणीसाठी 2200 रुपये फी ठेवल्याने विखेंकडून एकप्रकारे दुजाभाव केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.