‘त्या’ राशन तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, आमदार आशुतोष काळे यांची मागणी

626

लॉक डाऊनच्या काळात राशन धान्य हेच गरीबांची भूक भागविणारे आहे. त्यांच्या ताटातील अन्नाचा घास कोणी हिसकावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या वर पुरवठा विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देशभर लॉक डाऊन असल्याने ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रोज कामाला गेल्याशिवाय चालूच शकत नाही अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाने रेशनवर अन्न धान्य उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून या कुटुंबाची उपासमार होणार नाही हा यामागे उद्देश आहे. राशनचा काळा बाजार करण्याची संधी काहींनी साधली आहे. पुरवठा विभागाने त्यांच्यावर कारवाई केली परंतु एवढ्यावरच न थांबता कडक कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी. धान्य देताना हाताचे अंगठे घेणे बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध होणार नाही त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचले की नाही याची तहसीलदार यांनी खातरजमा करावी असेही आमदार काळे यांनी म्हटले आहे. योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील कुटूंबांना प्रति मानसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असून या कुटुंबांना लवकरच या तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासोबत या कुटुंबांनी आपल्याला दर महिन्याला मिळणारे रेशन घेऊन जावे असे आमदार काळे यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या