मारुतीचा ग्राहकांना दिलासा; 30 जूनपर्यंत वाढवली वॉरंटी आणि सर्व्हिस डेडलाईन

651

जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची कार आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुतीने ग्राहकांसाठी वॉरंटी व सर्व्हिसिंगची मुद्दत 30 जानेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन कालावधीत ज्याची वॉरंटी कालबाह्य झाली आहे, अशा ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

30 जून पर्यंत विनामूल्य सर्व्हिसिंग

मारुती कार असलेल्या ग्राहकांना 30 जूनपर्यंत नि: शुल्क सर्व्हिसिंग मिळणार आहे. त्याचबरोबर मारुतीची वॉरंटी असलेल्या ग्राहकांनाही 30 जूनपर्यंत सूट देण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घराबाहेर येणे बंद केलं आहे. हे पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी मारुतीने म्हटले होते की, ज्याची वॉरंटी 15 मार्च ते 30 एप्रिल 2020 दरम्यान कालबाह्य होईल, अशा ग्राहकांना 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे.

कार विक्रीवर कंपनी देत आहे जोर

मारुती लॉकडाऊनमध्ये कार विक्रीसाठी जोर देत आहे. यासाठी कंपनीने आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन मोठ्या खासगी बँकांशी हातमिळवणी केली आहे. स्वस्त कर्जासह ईएमआयवरील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये लॉकडाऊनमुळे कंपनीची एकही कार विकली गेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या