
परराज्यातील मंजूर लॉकडाऊनच्या काळत अडकून पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने विशेष रेल्वेच्या माध्यमातून 1522 लोकांना उत्तर प्रदेश येथे रेल्वेने रवाना करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 7806 जणांना रेल्वेने परराज्यात सोडण्यात आलेले आहे.
लॉक डाऊनच्या काळात अनेक जिल्ह्यातील अथवा परजिल्ह्यातील नागरिक नगर जिल्ह्यामध्ये अडकून पडलेले होते. ज्या वेळेला सरकारने यांना आपापल्या घरी जाण्यासाठी व्यवस्था केली होती. त्यानंतर एकत्रितपणे माहिती घेण्याचे काम प्रशासनाने केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 7806 जणांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे सोमवारी रात्री उत्तर प्रदेश मधील सीतापुर येथे व आसपासच्या परिसरात असलेले पंधराशे 22 जणांना रेल्वेने त्यांच्या गावी सोडण्यात आले आहे. रात्री उशिरा नगर येथून रेल्वे उत्तर प्रदेशाकडे रवाना झाली असल्याचेही उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत नगर जिल्ह्यातून उत्तर प्रदेश मध्ये सुरूवातीला 1251, मध्यप्रदेश येथे 1163, युपी मधील लक्ष्मणपुरा येथील 1225, सीतापूर 1402, गोडा येथील 1243, काल रात्री उशिराने उत्तर प्रदेश मधील सीतापुर येथे 1522 जणांना रवाना करण्यात आले आहे. एकूण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 7806 जण आपापल्या गावी रवाना झाले आहेत.































































