लॉकडाऊन काळात ग्राहक सेवेसाठी महावितरणला तंत्रज्ञानाची मदत

कोरोना (कोव्हीड 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लाॅकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. कर्जत येथील 33/11 केव्ही उपकेंद्रातील मंगळवारी रोहित्रात (पॉवर ट्रान्सफॉर्मर) बिघाड झाली असताना सहाय्यक अभियंत्यांनी प्रत्यक्ष चाचणी विभागाच्या अभियंत्यांशी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधून त्यातील बिघाड शोधून व दुरुस्त करून ग्राहक सेवेसाठी महावितरणची यंत्रणा सुरक्षित अंतर राखून सुद्धा तंत्रज्ञानाच्या  माध्यमातून तत्पर व  सज्ज असल्याचे दिसून आले आहे.

विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून सर्वत्र अंतर ठेवून कार्य करावे लागत आहे, अनेक जण घरातून सुद्धा आपल्या सेवेत कार्यरत आहेत. वीज  पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून महावितरणमधील अधिकारी-कर्मचारी हे महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु  ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. महाराष्ट्रातील जनता घरी असल्यामुळे त्यांना 24 तास सेवेकरिता महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये नगर मंडळ अंतर्गत असणाऱ्या कर्जत उपकेंद्रातील 10 MVA  क्षमतेच्या (पॉवर ट्रान्सफॉर्मर) रोहित्रामध्ये टेम्प्रेचर मध्ये वाढ होऊन रिलेमध्ये बिघाड येऊन वारंवार वीज पुरवठा  खंडित होऊ लागला. त्यामुळे कर्जत कक्ष 1 चे सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांनी अहमदनगर चाचणी विभागाचे अभियंता रोहन धर्माधिकारी यांचेशी मोबाईलवरून संवाद साधला, एरवी चाचणी विभागाची चमू पोहचून अशी दुरुस्ती करीत असते मात्र संचारबंदी आणि सुरक्षित अंतर राखण्याची परिस्थिती पाहता तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्ती करण्याचे ठरविले, त्यानुसार  व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधून रोहण धर्माधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांचे समवेत यंत्रचालक रविंद्र महाजन तंत्रज्ञ संतोष जगताप, निलेश सुरवसे, यादव भाये आणि जावेद शेख यांनी वायरींग तपासणे, कार्बन काढणे व तत्सम कार्ये केली. आणि बिघाड नाहीसा होऊन रोहित्र दुरुस्त होऊन वीज पुरवठा पूर्ववत झाला. सदर कार्य अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता प्रशांत मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यतत्परतेबद्दल नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी अभिनंदन केले आहे.

नाशिक परिमंडळ सुद्धा टेक्नोसॅव्ही  

 देशात लाॅकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरण सेवेसाठी तत्पर आहे, संचारबंदी असल्यामुळे अनेक जण कार्यालयात व घरून कार्य करीत असले तरी  नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर  हे दररोज मोबाईल वरून  नाशिक व अहमदनगर मंडळातील अधिक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्रितपणे बैठक घेऊन सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यानुसार सूचना त्यांना दिल्या जातात. या माध्यमातून यंत्रणा कनेक्ट असून  त्यामुळे तंत्रद्यानाचा वापर करून वीज सेवा अखंडित देण्यासाठी महावितरण सज्ज आहे . 

आपली प्रतिक्रिया द्या