मंदिरे, धार्मिकस्थळे सुरू करा; आमदार रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळं सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित यांनी ट्विट केले आहे. पर्युषण काळात जैन मंदिरे उघडण्यास परवानगी देता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच स्पष्टपणे म्हटलेले असताना रोहित पवार यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.