
हरीभजन आणि कीर्तन ही वारकरी संप्रदायाची परंपरा. मात्र कोरोनामुळे या भजन-कीर्तनावरच बंदी आली आहे. यामुळे ही परंपराच धोक्यात आली असून ग्रामीण भागात त्या त्या भागातील कीर्तनकारांना भजन, कीर्तनाची परवानगी द्यावी. ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांनी या कार्यक्रमांत योग्य सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी केल्यास कार्यक्रमही होईल आणि परंपरेचे जतनही होईल, अशी मागणी वारकरी प्रबोधन महासमितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. मंदिरे बंद असून भजन, कीर्तनही बंद झाले आहे. अशा वेळी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी भजन, कीर्तनाला परवानगी द्यावा. यातून कोरोनाबाबतही जनजागृती होईल, अशी मागणी वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर शास्त्री यांनी केली आहे. अनेक कीर्तनकार हे भूमीहिन शेतकरी आहे. त्यामुळे भजन, कीर्तनाकरच त्यांची उपजीविका चालते. अशा कीर्तनकार व त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या कीर्तनकारांना अन्नधान्य, औषधे तसेच आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारने पुढावार घ्यायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम वारकऱयांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिले असून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या या समस्येचे निराकरण करावे असे रामेश्वर शास्त्राr यांनी म्हटले आहे.



























































