
पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरुन एका तरुणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने भर चौकात धारधार शस्त्राने गळ्यावर, छातीवर वार करुन 22 वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना लोहरा तालुक्यातील सास्तुर येथे मंगळवारी रात्री घडली. दिलीप शिंदे असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सास्तूर येथील मयत दिलीप साहेबराव शिंदे (22) व आरोपी खादर शेख हे शेजारी आहेत. मयत दिलीप शिंदे याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबध असल्याचा संशय आरोपी खादर शेख याला होता. याच कारणास्तव शेख याने आपल्या पत्नीला काही महिन्यांपूर्वी सोडून दिले होते.
मंगळवार, 17 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान लाईट गेल्याचे पाहुन अंधाराचा फायदा घेत आरोपी खादर शेख याने आपला साथीदार उस्मान केळगावे, निजाम केळगावे यांच्या मदतीने क्रांती चौकात दिलीप शिंदेवर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी त्याच्यावर धारधार शस्त्राने गळ्यावर, छातीवर वार करत त्याची हत्या केली. यानंतर आरोपी खादर शेख याने सास्तूर दुरक्षेत्र पोलीस स्थानकात हजर होऊन आपला गुन्हा कबुल केला. इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपीना तात्काळ अटक करु असे आश्वासन पोलिस उपविभागीय अधिकारी उदमले यांनी मयताच्या कुटुंबाला दिले.
रम्यान, आरोपी खादर शेख याला मयतच्या नातेवाईकांनी पोलिस चोकी समोर माराहण करुन जखमी केल्याने आरोपी खादर शेख याच्यावर धाराशिव येथिल जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.





























































