राष्ट्रवादीत निष्ठेनं काम केलं पदरात काय पडलं?- जयदत्त क्षीरसागर

41
jaydutt-khirsagar

सामना प्रतिनिधी । बीड

मी राष्ट्रवादीला बाजूला सारले आणि राष्ट्रवादाला जवळ केले. जेथे जातो तेथे प्रामाणिकपणे काम करत असतो. राष्ट्रवादीत ही निष्ठेने काम केले पदरात काय पडलं, असा सवाल उपस्थित करून आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्यात घडळाची टिकटिक आता बंद होणार राष्ट्रवादाला बळ मिळणार, असा विश्वास आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ केज येथे प्रचंड जाहीरसभेत आमदार जयदत्त क्षीरसागर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले मुंडे भगिनींनी जातीपातीच्या पुढे जाऊन विकासाची कास धरली, त्यांच्या दूरदृष्टीमुळे बीड जिल्ह्यात विकास गंगा वाहत आहे. राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार असल्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न सुटणार आहे. सिंधफना आणि मांजरा नदीत पाणी लिफ्ट करून हा भाग सुजलाम सुफलाम केला जाणार आहे. भविष्यात अनेक योजना पूर्णत्वास घेऊन जायच्या आहेत. या शुभ कामाचे तुम्ही साक्षीदार व्हा, असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या