
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 17 जागांसह देशभरातील 71 जागांवर मतदान पार पडत आहे. राज्यामध्ये सोमवारी सकाळपासून मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह दिसून आला. मतदान केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भर उन्हात लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राजकीय नेते, कलाकार आणि सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी कुटुंबासह मतदान केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले. तसेच एकनाथ शिंदे, राजन विचारे, शिवाजीराव आढळराव पाटील, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, सदा सरवणकर यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यासह गजानन किर्तीकर, प्रियंका चतुर्वेदी, पूनम महाजन यांनीही मतदान केले.

























































