Lok sabha 2019 अरविंद सावंत यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना भाजप महायुतीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते, युवासेनाप्रमु आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अरविंद सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून राज पुरोहित आणि मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नुकतेच देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव केला होता.

arvind-sawant-nomination