नंदूरबार मतदारसंघात हिना गावीत विजयी, दुसऱ्यांदा मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नंदूरबार

नंदूरबार लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी विजय मिळवला आहे. हिना गावीत यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

नंदूरबार लोकसभा मतदारसंघामध्ये अक्कलकुआ, शहादा, नंदूरबाद, नवापूर, साक्री आणि शिरपूर ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. हिना गावित यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5,79,486 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक गावित माणिकराव होडल्या यांना 4,72,581 मतं मिळाली होती.

2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसचे गावित माणिकराव होडल्या यांनी विजय मिळवला होता, तर भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला होता. विजयी उमेदवार गावित माणिकराव होडल्या यांना 2,75,936 मतं मिळाली होती, तर सपाचे उमेदवार गावित शरद कृष्णराव यांना 2,35,093 मतं मिळाली होती. भाजपचे उमेदवार नटवडकर सुहास जयवंत यांना 1,95,987 मतं मिळाली होती.