लोखंडवालाही दिवाळखोरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक मंदीच्या कचाटय़ात अनेक जण सापडले असताना मुंबईतील प्रख्यात लोखंडवाला बिल्डरनेही दिवाळखोरी जाहीर केली आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक बिल्डर, व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. मंदीमुळे घरे बांधण्यासाठी पैसे नाहीत आणि तयार घरांना ग्राहकच नाही, अशी ही अडचण आहे. तशात बँकांचेही कोटय़वधी रुपयांचे कर्ज डोक्यावर आहे.

घरांचे आरक्षण केलेले हजारो ग्राहक अडचणीत
वाधवान यांच्या ‘एचडीआयएल’ या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर आता लोखंडवाला इफ्रास्ट्रक्चरनेही तोच मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे या विकासकाकडे घरांचे आरक्षण केलेले हजारो जण अडचणीत सापडले आहेत.