
कानपूरहून मुंबईत आलेल्या एका महिलेवर लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर तिघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. जेवण देतो असे सांगत तिघांनी महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून टिळकनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसऱया आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार आहे.
मूळच्या उत्तर प्रदेशच्या कानपूरची राहणारी पीडित महिला मंगळवारी कानपूरहून मुंबईत आली. रात्री लोकमान्य टर्मिनसमध्ये उतरल्यानंतर ती स्थानकाबाहेर आली. मुंबईतले काहीच माहीत नसल्याने गोंधळलेली महिला स्थानकाबाहेर बसून राहिली. त्यावेळी टर्मिनसवर हमाली करणारा अब्दुल शेख महिलेकडे गेला आणि तिला जेवण देण्याचे आमिष दाखवत टर्मिनस परिसरात असलेल्या उड्डाणपुलाखाली घेऊन गेला. तेथे अब्दुल शेख आणि दीपू गौतम या दोघांनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला.

























































