दगाबाज रे… इव्हीएम मशीन बंद असल्याने संताप, मतदार घरी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
1983 साली 8 राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी या मशिनचा वापर करण्यात आला.

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया दोन लोकसभा मतदार संघासह देशात ४ ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येते आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या मतदानावेळी सकाळच्या सत्रात तब्बल २० ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या वेळी स्थानिक नेते तसेच मतदारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

पालघरमध्ये मतदानाला सुरुवात होताच सायवनमध्ये इव्हीएम मशीन बंद असल्याचे वृत्त आले. विरार मनवेलपाडा, नालासोपाऱ्यातील मदर मेरी स्कूल आणि राहुल इंटरनॅशनल स्कूल, एमपीडी स्कूल येथील मशीन बंद असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. डहाणू कूडे येथील मतदान केंद्रावर मशीन बंद असल्याने दीड तास उलटूनही मतदान सुरू झालेले नाही. सायवन भागात मतदारांनी आपली नाराजी यावेळी व्यक्त केली. कामच्या वेळात अवघी दोन तासाची सूट मिळाली असते, अशातही इव्हीएमचा घोळ झाल्यास मतदानासाठी जास्त वेळे सर्वांनाच थांबता येत नाही, त्यांना आपला हक्क बजावता येत नाही, अशी तक्रार नागरिक करत होते.

kude-school-dahanu

यानंतर थोड्याच वेळात भंडारा-गोंदिया मतदार संघात तुमसर तालुक्याती खरबी, हिंगणा, मांढळ, खापा यासह तब्बल ११ मतदान केंद्रांवरून इव्हीएम बिघाडाचे वृत्त मिळाले.

दरम्यान, यूपीतील कैराना येथे सुरू असलेल्या मतदानावेळी ४ मतदान केंद्रांवर देखील इव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.