गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून निवडणूक पथकावर हल्ला; एक जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
naxal-attack
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली/नागपूर

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांसह 20 राज्यांतील 91 मतदारसंघांत  आज मतदान होत आहे. मतदाना वेळी नक्षलग्रस्त भागातील मतदारसंघांमध्ये माओवाद्यांचे आव्हान आहे. आज गडचिरोलीत निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यात एक जवान जखमी झाला आहे.

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा येथे मंगळवारी नक्षलवाद्यांनी भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला करीत आयईडी स्फोट केला होता. यात आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला, तर चार जवान शहीद झाले हेते. या हल्ल्यानंतर नक्षलग्रस्त भागातील मतदारसंघांमध्ये हायऍलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गडचिरोलीत मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. घनदाट जंगल असलेल्या भागात सीआरपीएफच्या बटालियन तैनात केल्या आहेत. बंदोबस्तात निवडणूक पथके मतदान केंद्र परिसरात जात असताना आज गडचिरोलीतील एटापल्ली येथील गट्टा भागात नक्षलवाद्यांनी स्फोट घडविला. यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांकडून घातपात होण्याची शक्यता असल्याने बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.

उन्हाचा चटका

विदर्भात सर्वत्र पारा 40-42 अंशांवर गेला आहे. आग ओकणारा सूर्य आणि मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याचे आव्हान मतदारांपुढे आहे. यामुळे मतदान किती टक्के होते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

महाराष्ट्राचे लक्ष

2014च्या निवडणुकीत सातही मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनी प्रचंड विजय मिळविला होता. त्यामुळे 2019कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.हे आहेत प्रमुख उमेदवार

Photo – लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात ‘यांची’ प्रतिष्ठा पणाला