
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेचा मुहूर्त जवळ आला आहे. शुक्रवार 15 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला. तर निवडणूक आयुक्तांचे एक पद आधीच रिक्त आहे. या दोन्ही पदांवर नव्या नियुक्तीसाठी 15 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीची बैठक होणार होती. मात्र ही बैठक आता 14 मार्च रोजी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
14 मार्च रोजी निवडणूक आयुक्तांची दोन रिक्त पदे भरण्यात आल्यानंतर 15 मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे.
























































