अंधेरीतील मेळावा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 4 च्या शिवसैनिक आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक नुकतीच मोठय़ा उत्साहात पार पडली. यावेळी विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱयांनी शिवसेनेत प्रवेश केला.

अंधेरीतील जानकीबाई हॉल येथे पार पडलेल्या या बैठकीला विभागप्रमुख-आमदार अनिल परब, उपनेत्या – विभाग संघटक राजुल पटेल, शिवसेना उपनेते व उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर, लोकसभा निरीक्षक-आमदार विलास पोतनीस यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या पुढाकाराने अंधेरी पश्चिम विधानसभेतील युथ काँग्रेस अध्यक्ष मुर्गन उडियार, मिंधे गटाचे उपशाखाप्रमुख सतीश उडियार, सुंदर पाटील, शरद हरिजन, इरफान शेख, विजय हरिजन, नवीन हरिजन, राजकुमार ऊर्फ बाबू तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी यावेळी विभागप्रमुख-आमदार अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.