लोणार सरोवराचे पाणी झाले हिरवे, पाण्याचे नमूने तज्ज्ञांकडे पाठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही दिवसापासून सरोवराच्या पाण्याचा गुलाबी रंगा संदर्भात संशोधनाचा विषय म्हणून समोर येत होता. परंतु मध्यरात्रीनंतर लोणार शहरांमध्ये  33 मिलिमीटर झालेल्या पावसाने सरोवरच्या गुलाबी रंगाच्या पाण्यामध्ये थोडेफार परिणाम होतांना दिसून येत आहे. झालेल्या पावसा मुळे दमट वातावरण कमी झाले आणी पावसाचे पाणी त्यात मिसळल्याने सरोवराच्या गुलाबी रंगाच्या पाण्यामध्ये बदल होऊन सरोवराच्या काठा कडून सरोवराचे पाणी हिरवे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाण्यामध्ये बदल होताना दिसत असून पूर्वीप्रमाणेच हिरवे पाणी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे   सरोवराच्या गुलाबी रंगाच्या पाण्याच्या चर्चेला पूर्णविराम  मिळाला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन काळात शहरातील नागरिक हे सरोवराच्या काठावर फिरण्यासाठी जात होते. यादरम्यान नागरिकांनी सरोवराच्या गुलाबी रंगाच्या पाण्यासंदर्भात चर्चा करताना आपली विविध मते व्यक्त केली. ही बाब प्रसारमाध्यमांना माहिती मिळताच विविध प्रसारमाध्यमांनी अभ्यासकांडून माहिती घेऊन गुलाबी रंगाच्या पाण्याची तपासणी संदर्भात माहिती दिली आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी सकाळपासून सरोवराच्या काठावर गर्दी केली तसेच दिवसभरात शहरांमध्ये गुलाबी रंगाच्या सरोवराच्या पाण्यासंदर्भात चर्चेला ऊत होते. त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे तरीही या पाण्याचे नमुने परीक्षणासाठी आगरकर इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी पुणे आणि गोवा येथील संस्था ओषोनोग्राफी यांच्याकडे पाठवले आहेत.