शिस्तभंग केल्याने कोहलीला दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। साऊदम्पटन

हिंदुस्थानने 224 या असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना अफगाणिस्तानवर विजय मिळवत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखली. मात्र लढतीदरम्यान शिस्तभंग केल्याने ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मैदानावर गरजेपेक्षा जास्त आक्रमक अपील करीत पंचांवर दबाव आणल्याप्रकरणी विराटवर ही कारवाई करण्यात आली.

हिंदुस्थानने पहिल्याच षटकात अफगाणिस्तानचा फलंदाज पायचित असल्याचे अपील केले होते, मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावले. पंचांच्या या निर्णयाविरुद्ध डीआरएसचा निर्णय घेतल्यानंतर तिसऱया पंचांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजाला नाबाद ठरवले. याआधी विराटने गरजेपेक्षा जास्त अपील करीत पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय तिसऱया पंचांनीही फलंदाज नाबाद ठरवल्यानंतर विराटने आपली नाराजी व्यक्त केली होती. याचबरोबर अफगाणिस्तानच्या डावातील 29 व्या षटकांत पायचितचे अपील करताना विराट कोहली पंच अलीम दार यांच्याकडे आक्रमकपणे धावत गेला.