श्रीगोंदा रेल्वेस्थानकावर दरोड्याचा प्रयत्न फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश जेवरे, कर्जत

नगर- दौंड लोहमार्गावर श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर आज (१५) पहाटे २ च्या सुमारास वाराणसी-हुबळी एक्सप्रेस थांबली असताना ७ ते ८ दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र टीसी आणि रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे हा पर्यटन फसला. रेल्वे जवानांनी रोखलेल्या बदुंका पाहून दरोडेखोरांनी हत्यारे टाकून पलायन केले.

रेल्वे पोलिसांनी दरोडेखोरांनी टाकून दिलेले चॉपर, एअर पिस्तुल, दोन मोबाईल जप्त केले आहेत. याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितले की, हे ७ ते ८ दरोडेखोर कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून वाराणशी हुबळी एक्स्प्रेस मध्ये स्लीपर कोचमध्ये बसले. ते सर्व जण एकमेकांशी मराठीतून बोलत होते.

वाराणशी हुबळी एक्स्प्रेस श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर काँसिंगसाठी थांबली आणि दरोडेखोरांनी एकमेकांना सांकेतिक भाषेत संकेत देत आरडाओरडा सुरू केली. तिकीट निरीक्षक गडदे आणि थोरात यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी तातडीने रेल्वेमधील सुरक्षा जवान दादा येडे, अमोल साळवे, जी आर काळे यांच्याशी संपर्क साधून याची कल्पना दिली.

या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलीस बंदुका घेऊन येत असल्याचे पाहून दरोडेखोरांमध्ये चलबिल झाली. त्यांनी रेल्वेतून उड्या टाकून अंधारात पळ काढला. मात्र, या गडबडीत त्यांच्यातील एकाची बॅग खाली पडली. या बॅगेत चॉपर, चाकून, एअर पिस्तुल, दोन मोबाईल रेल्वे पोलिसांना आढळून आले.