
नशा करून धूम स्टाइलने मोटारसायकल चालवून रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला मारहाण करून मोबाईल, सोन्याची चेन चोरून पळालेल्या तिघांना साकीनाका पोलिसांनी अवघ्या 12 तासांत बेडय़ा ठोकल्या. सलीम चौधरी,गुलाम अली खान, अब्दुल अलीम खान अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार बुधवारी पहाटे साकीनाका येथून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी तक्रारदारांना मारहाण करून मोबाईल, चेन पळवून नेली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.






























































