
धाराशिव जिल्ह्यातल्या तेरखेडा येथील मंदिरात मंगळवारी सकाळी भगवान श्रीरामाची मूर्ती भंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मूर्तीची विटंबना करण्यात आली असल्याचे बोलले जात असले तरी काही जण ही मुर्ती नैसर्गिकरित्या भंग पावली आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच संपूर्ण गावात बंद देखील ठेवण्यात आला आहे.
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे काही अज्ञात समाज कंटकांकडून भगवान श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना केल्याचे समजते. धार्मिक,भावनिक व जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हे केलेले कृत्य असावे असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र काही कारणास्तव मूर्ती आपोआप पडून देखील भंग पाऊ शकते असे देखील बोलले जात आहे.
पोलिस प्रशासनाने वेळीच या प्रकरणाची दखल घेत वेळीच परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून या मागचे कारण लवकरात लवकर शोधून काढू’, असे पोलिसांनी सांगितले आहे.

























































