
यंदाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील टीम इंडियाच्या अपयशाचा मोठा फटका वर्ल्ड कप लढतींना स्पॉन्सर्ड करणाऱया पुरस्कर्त्या कंपन्यांना बसणार आहे. हिंदुस्थानी संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाऊ न शकल्याने विश्वचषक पाहणाऱया प्रेक्षकांच्या संख्येत 50 टक्के घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे 17 मोठय़ा कंपन्यांचे 1 हजार कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण विश्वचषक खेळणाऱया 12 देशांपैकी 11 देशांची एकूण लोकसंख्या केवळ 64 कोटी आहे, जी हिंदुस्थानच्या निम्मी (135 कोटी) आहे.
टी-20 विश्वचषकातील टीम इंडियाचा प्रवास लवकर संपला असला तरी टीव्ही अधिकारांवर परिणाम होणार नाही, कारण स्टार स्पोर्ट्सने 2015 ते 2023पर्यंत होणाऱया सर्व आयसीसी इव्हेंटसचे हक्क 198 कोटी डॉलरमध्ये (सुमारे 14.8 हजार कोटी रुपये) विकत घेतले आहेत. पण स्टार स्पोर्ट्सच्या त्या अपेक्षांना नक्कीच झटका बसू शकतो. हिंदुस्थान उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत न पोचल्याने उर्वरित 20-25% जाहिरात स्लॉट प्रीमियम दराने विकून मोठा नफा कमावण्याचे स्टार स्पोर्ट्सचे स्वप्न हवेत विरले आहे.
प्रीमियम दराने स्लॉट न विकल्यास नुकसान
बाजारातील जाणकारांच्या मते टीम इंडियाच्या विजय-पराभवाचा थेट परिणाम रेटिंगवर होतो.
प्रेक्षक संख्या थेट जाहिरात कंपन्यांच्या नफ्याशी जोडलेली असते. यामुळेच हिंदुस्थान-पाक सामन्याचे जाहिरात स्लॉट महाग.
ही स्पर्धा सणासुदीच्या काळात कंपन्यांसाठी बुस्टर डोस आहे.
टी-20 वर्ल्ड कपचे अर्थ-शास्त्र ः 10-10 सेकंदांचे जाहिरात स्लॉट 14-15 लाख रुपयांपर्यंत विकले गेले आहेत.


























































