लखनौमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 7 ठार

315
file photo

लखनौ येथील गाजियाबाद येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या कारखान्यात आणखीन 20 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे. आतापर्यंत यातून 10 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून या कारखान्यात काम करणाऱयांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना येथे असून याठिकाणी केकवर वापरण्यात येणाऱया फटाक्यांची निर्मिती केली जात होती. या घटनेनंतर आमदार डॉ. मंजू शिवाच आणि भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सिंघल यांनी धाव घेतली. पण त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आपली प्रतिक्रिया द्या