‘या’ चावऱ्या खेळाडूने दुसऱ्यांदा केले लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बार्सिलोनाचा प्रसिद्ध खेळाडू व मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंना चावण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला लुईस सुआरेझ हा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. मात्र सुआरेझने त्याच्या पत्नीसोबतच पुन्हा एकदा लग्न केले आहे. उरुग्वे येथील माल्डोनाडे शहरातील एका पंचताराकित रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला असून फुटबॉलविश्वातील प्रसिद्ध खेळाडूंनी या सोहळ्याला हजेरी लावली.

luis-suarez-wife

लुईस सुआरेझ व त्याची पत्नी सोफिया हे वयाच्या 14 व्या वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. 26 डिसेंबर 2009 ला हे दोघे विवाहबद्ध झाले होते. या वर्षी 26 डिसेंबरला त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. दहाव्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांनी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाला लिओनेल मेस्सी व नेमार देखील उपस्थित होता.

लुईस सुआरेझ हा मैदानावर त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना चावण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूला चावल्यानंतर रेड कार्ड मिळू नये म्हणून अनेकदा स्वत:ला देखील जबरदस्त लागले असल्याचे नाटक देखील करतो. त्याचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.