
टॉप्स ग्रुप कथित घोटाळय़ाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी एम. शशिधरन यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले. या कंत्राटात कोटय़वधींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवून मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडीने अटक केली. याप्रकरणी शशिधरन यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. कुशल मोर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आपले अशील मार्थ शशिधरन यांना यात गोवले असून त्यांना कोणतेही पैसे यातून मिळाले नाहीत. याचिकाकर्त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही.





























































