
सामना प्रतिनिधी । लातूर
किल्लारी पासून जवळच असलेल्या लामजना औसा तालुक्यातील लामजना-औसा रोडवर असलेल्या मदरशात संस्थाचालकांनी शिक्षकावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लामजना येथिल अरबी मदरशात संस्थाचालक मुफ्ती वाजीद अब्दुल माजीद शेख (वय 38 वर्ष )आरबी मदरसा लामजना याने मदरशात शिक्षक म्हणून मागील सहा महिन्यापासून कार्यरत असलेल्या तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य केले. संस्थाचालक त्याला बोलवून माझ्या पायाला इजा झाली माझे पाये दाब असे सांगून पाय दाबायला लावायचा, एवढेच नव्हेतर त्यानी गेली तीन महिंन्यापासुन त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करावयाचा प्रकार सुरु झाला होता.
संस्थाचालक मुक्तीवाजीद अब्दुल माजीद शेख यानी पीडित तरुणावर 10 ते 15 वेळा बलात्कार केला. याप्रकरणी फिर्यादी पीडित तरुणाच्याअ तक्रारीवरून रविवारी किल्लारी पोलीस स्थानकात आरोपी मुफ्ती वाजीद अब्दुल माजीद शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास किल्लारी पोलीस करीत असून घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.



























































