भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत पटले यांचा ४८,०९७ मतांनी दारुण पराभव केला. या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडे असलेली जागा खेचून आणली असून विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची भर पडली आहे.

या निवडणुकीत मधुकर कुकडे यांना ४ लाख ४२,२१३ मते मिळाली तर हेमंत पटले यांना 3३ लाख ९४,९१६ तर भारिप बहुजन संघाचे एल. के. मडावी यांना ४०, ३२६ मते पडली.मधुकर कुकडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. पहिल्या फेरीत कुकडे यांना केवळ २७५ मतांची आघाडी होती. ही आघाडी अखेरच्या फेरीत ४८हजारवर गेली. भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली.