जनार्दन लवंगारे यांना मधुकर तोरडमल पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वैशिष्टय़पूर्ण अभिनय शैलीने रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन लवंगारे यांना ‘मधुकर तोरडमल स्मृती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवंगत ज्येष्ठ नाटय़ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबियांतर्फे रंगभूमीवर चौफेर कामगिरी करणाऱया रंगकर्मीला हा पुरस्कार दिला जातो. मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

24 जुलै या मधुकर तोरडमल यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार सोहळा सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन पार पडेल. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून यापूर्वी हा पुरस्कार नेताजी भोईर, संतोष पवार आणि राजन पाटील यांना मिळालेला आहे. त्यानंतर यावर्षी लवंगारे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

प्रा. तोरडमल यांनी नाटय़-चित्रपट क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, लेखनापासून विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली होती. त्यांनी ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक अजरामर केले.