कोविड वॉर्डमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा भांगडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना वॉर्डामध्ये गाण्याच्या भेंडय़ा किंवा गरबा खेळतानाचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. घरापासून दूर एकटेच उपचार घेत असलेल्या रुग्णांना लवकर बरे वाटावे आणि कोरोनाशी लढण्यासाठी त्यांना सकारात्मक उर्जा मिळावी यासाठी डॉक्टर, आरोग्यसेवकदेखील त्यात सहभागी होताना दिसतात. सध्या कोरोना वॉर्डमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यात चक्क दोन वर्षांचा मिहीर बल्ले बल्ले म्हणत भांगडा करताना दिसतोय. गंमत म्हणजे मिहिरने वॉर्डमधील वृद्धांनादेखील भांगडा करण्यासाठी हट्ट धरल्याने सर्वांनीच आजारपण विसरून त्याचे हट्ट पुरवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या हौशांगाबादमधील नोबल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सर्वजण या चिमुकल्याभोवती गराडा करून भांगडा करताना दिसतायत.