विमान आणि हेलिकाॅप्टरवर 290 कोटी खर्च

मध्य प्रदेशात भाजप सरकारने विमान आणि हेलिकाॅप्टरवर अवघ्या पाच वर्षांत तब्बल 290 कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. काँग्रेस आमदार प्रताप ग्रेवाल आणि पंकज उपाध्याय यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विमान आणि हेलिकाॅप्टरवर भाड्यापोटी दररोज 21 लाख रुपये खर्च होत असल्याचे म्हटले आहे.

जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत मध्य प्रदेश सरकारने 290 कोटी रुपये विमान आणि हेलिकाॅप्टरच्या भाड्यावर खर्च केले आहेत. 2025 च्या 11 महिन्यांत 90.7 कोटी रुपये खासगी कंपनीला भाडय़ापोटी दिले आहेत. 2019 मध्ये वार्षिक विमानाचे भाडे 1.63 कोटी रुपये होते. ते आता 2025 मध्ये वाढून 90.7 कोटी रुपये झाले आहे, असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.