कमलनाथ यांच्या ‘आयटेम’वरून मध्य प्रदेशात गदारोळ

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ माजला आहे. कमलनाथ यांनी डबरा येथील निवडणूक सभेमध्ये इमरती देवींना ‘आयटेम’ म्हटले. त्याच्या निषेधार्थ अनेक राजकीय नेत्यांनी विविध शहरांमध्ये मूक धरणे धरले आहे.

कमलनाथ यांच्या वक्तव्यावरून इमरती देवी संतप्त झाल्या आहेत. कमलनाथ यांना मध्य प्रदेशात राहण्याचा अधिकार नसून त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. कमलनाथ यांनी मात्र आपल्या बचावासाठी ‘आयटेम’ हा शब्द अपमानास्पद नसून आमदाराचे नाव न आठवल्याने आपण ‘आयटेम’ म्हटले असे स्पष्टीकरण दिले आहे.

कमलनाथ यांच्या निषेधार्थ मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जुन्या विधानसभा भवनातील गांधी पुतळ्यासमोर धरणे धरले आहे. हा चंबळच्या मुलीचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी इंदूरमध्ये तर केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्यासह ग्काल्हेरमध्ये धरणे धरले आहे. काँग्रेसने कमलनाथ प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट वरून कमलनाथ यांना नोटीस पाठवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या