
लसीकरणासाठी दिलेले टार्गेट पूर्ण न झाल्याने एका जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना फासावर लटकविण्याचा इशारा दिला आहे. कौशलेंद्र विक्रम सिंग असे त्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव असून ते मध्य प्रदेशमधील ग्वालियरचे जिल्हाधिकारी आहेत. शनिवारी भितरवार तालुक्याच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
During a meeting on #CovidVaccine when Gwalior collector Kaushlendra Vikram Singh came to know that the COVID-19 vaccination target was not achieved. He said “There shouldn’t be a delay of even a single day. If it happens, ‘phasi pe tang dunga’@ndtv@ndtvindia pic.twitter.com/n9fOXovRa8
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) December 15, 2021
‘लसीकरणाच्या कामात एक दिवस देखील उशीर व्हायला नको. जर तसे झाले तर तुम्हाला फासावर लटकवेन. प्रत्येकाला लस दिली गेली पाहिजे. जा आणि लोकांना विनवन्या करा. शेतात जा. लोकांसमोर त्याचे महत्त्व मांडा. त्यांच्या घरात 24 तास ठाण मांडून बसा. मला शंभर टक्के लसीकरण हवे आहे’, असे या बैठकित कौशलेंद्र बोलताना दिसत आहेत.
या क्लिपविषयी पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपण असे म्हणालो नसल्याचे म्हटले आहे. जर टार्गेट पूर्ण झालं नाही तर कर्मचाऱ्यांना निलंबीत करणयात येूईल असा इशारा दिला आहे.


























































