जोकोविचने चॅम्पियन तिसऱयांदा जिंकली माद्रिद स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। माद्रिद

सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविच याने टेनिसकोर्टवर दमदार कामगिरी करीत तिसऱयांदा माद्रिद ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचने पुरुष एकेरीतील जेतेपदाच्या लढतीत स्टेफनोस सितसिपासला पराभूत करीत झळाळता करंडक पटकावला. याचसह त्याने विक्रमी 33 व्या मास्टर्स अजिंक्य पदालाही गवसणी घातली हे विशेष.

ग्रीसचा 20 वर्षीय युवा टेनिसपटू स्फेफनोस सितसिपासने उपांत्यपूर्व फेरीत ऍलेक्झॅण्डर झ्वेरेवला तर उपांत्य फेरीत रफाएल नदालला पराभूत केले होते. त्यामुळे नोवाक जोकोविचसमोर अंतिम फेरीत कडवे आव्हान उभे ठाकले जाईल अशी चर्चा टेनिस वर्तुळात रंगू लागली. पण नोवाक जोकोविचच्या झंझावाती खेळासमोर त्याची डाळ शिजली नाही. अखेर सर्बियाच्या स्टार खेळाडूने ही लढत 6-3, 6-4 अशा फरकाने खिशात टाकली.

हालेपला हरवत बर्टेन्स बनली विजेता
नेदरलॅण्डच्या किकी बर्टेन्स हिने रोमानियाच्या सिमोना हालेपला पराभूत करीत माद्रिद ओपन महिला एकेरीच्या गटाचे जेतेपद पटकावले. किकी बर्टेन्स हिने सिमोना हालेपवर 6-4, 6-4 अशा फरकाने विजय मिळवत कारकीर्दीतील नवव्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.