
सामना ऑनलाईन । मुंबई
उद्धव ठाकरे हे काही वेळातच नया घाट येथे पोहचणार असून तेथे ते शरयू आरती करणार आहेत. त्याच वेळी देशभरातील विविध मंदिरांमध्येही महाआरती होणार आहे. मुंबईतील मंदिरेही घंटानादाने दुमदुमणार आहेत. दादरमधील सिद्धिविनायक मंदीर, परळ येथील खापरेश्वर हनुमान मंदिरात, विलेपार्ले पूर्व येथील शिवाजी चौकात असलेल्या राम-हनुमान मंदिरात महाआरतीसाठी भाविक जमण्यास सुरुवात झाली आहे.
- सिद्धिविनायक मंदिराबाहेरील महाआरती –
- गोरेगाव येथील पंचमुखी हनुमानाच्या मंदिराबाहेर भाविकांची गर्दी, जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला




























































